नांदेडमध्ये पुन्हा सापडले चार पिस्टल;पाच जण ताब्यात

क्राईम

नांदेड, बातमी24:- दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेत,चार पिस्टल,दोन काडतुस व इतर घातक शस्त्र पोलिसांनी ताब्यात घेतले.ही कारवाई मंगळवार दि.19 रोजी रात्री करण्यात आली.नांदेड येथे संजय बियाणी हत्येनंतर पोलीस अलर्ट झाली असून धाडस्त्र व कारवाई सुरूच आहेत.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मनीष उर्फ मन्या पिता अशोक कांबळे (वय.32), दक्षक उर्फ खरब्या पिता बालाजी सरोदे (वय.25 वर्षे),अक्षय उर्फ सोनू दिगांबर शंकपाल (वय.30 वर्षे),प्रशांत उर्फ बाळ्या रोहिदास सोनकांबळे (वय.38 वर्षे) अतुल बबनराव चौदते (वय.22 वर्षे) सर्व राहणार आंबेडकर नगर येथी ल असून त्यांच्याकडून 4 गावठी पिस्टल,2 जिवंत काडतुस,1 एअर पिस्टल,एक दोर व चार मोबाईल असा 1 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर,पांडुरंग माने,परमेश्वर चव्हाण,डी. एन.काळे,जयसवंत शाहू,गोविंद मुंडे,गुडेराव कारले,सखाराम नवघरे,पदमसिंह कांबळे यांच्या पथकाने केली.