सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांचा पदक देऊन सन्मान

क्राईम

नांदेड, बातमी24:-नांदेड पोलीस दलातील कर्तव्यदक्ष तथा धडाडीचे पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांना महाराष्ट्र दिनाच्या पूर्व संध्येला उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांचे पदक जाहीर झाले होते.आज महाराष्ट्र दिनी भारती यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पाकलमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पदक देऊन गौरव करण्यात आला.

मागील चार वर्षांपासून नांदेड स्थानिक गुन्हे शाखेत सहायय पोलीस निरीक्षक म्हणून दमदार कामगिरी आहे. अनेक गुन्ह्याचा छडा लावून भल्या-भल्या गुंडांना जेलमध्ये घालणारे भारती यांनी काही वर्षांपूर्वी एक गुंडास यमदसनी घातले होते. तपासात बाप माणूस अशी ओळख असलेल्या पांडुरंग भारती यांचा शासनाने यथोचित सन्मान केल्याची भावना लोकांमधून व्यक्त होत आहे.
एक मे महाराष्ट्र दिनी पोलीस मैदानावर झालेंक्या समारंभात पाकलमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, निसार तांबोळी,प्रमोद शेवाळे,जिल्हा परिषद सीईओ वर्षा ठाकूर,मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने आदींची उपस्थिती होती.