२५ हजाराची मागणी करणारा कंत्राटी ग्रामसेवक जाळ्यात

क्राईम

नायगाव,बातमी24 : प्लॉट फेरफार लावण्यासाठी २८ हजाराची मागणी करुन २५ हजाराची रक्कम खाजगी व्यक्ती मार्फत स्विकारणारे घुंगराळा येथील कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई दि.३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास करण्यात आली.या प्रकरणी
खाजगी व्यक्तीसह ग्रामसेवकास ताब्यात घेतले असून नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

निळेगव्हाण येथील रावसाहेब जाधव यांचे घुंगराळा येथे दोन प्लाट असून, त्या प्लाटचा फेरफार लावण्यासाठी घुंगराळा येथील कंत्राटी ग्रामसेवक म्हैसाजी कदम ३० हजार रुपयांची मागणी केली होती.
अशाच प्रकारच्या प्लाटचा फेरफार करण्यासाठी कदम यांनी निळेगव्हाणच्या जाधव यांना ३० हजाराची लाच मागितली.
निळेगव्हाणचे प्लाटधारक जाधव तडजोड यांच्याकडून तडजोडीअंती २५ हजार रुपये घेण्याचे ठरले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे सिद्ध झाले होते. त्यावरून दि.३ डिसेंबर रोजी येथील हेडगेवार चौक परिसरात लावण्यात आलेल्या सापळया खाजगी इसम विठ्ठल माने यांनी तक्रारदारा कडुन उपरोक्त कामासाठी २५ हजार लाचेची रक्कम स्विकारली आहे. म्हणुन लोकसेवक (१) म्हैसाजी आनंदराव कदम, वय ३९ वर्ष, व्यवसाय नोकरी ग्रामसेवक, ग्रामपंचायात कार्यालय घुंगराळा ता. नायगांव जि. नांदेड रा. पिपंळगाव, ता. नायगांव जि. नांदेड (२) खाजगी इसम विठ्ठल देविदास माने, वय ३२ वर्ष, व्यवसाय फुल विक्रेता, रा. पिपंळगाव ता. नायगांव जि. नांदेड यांचे विरूध्द पोलीस ठाणे नायगांव येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सदरची सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद अतिरिक्त पद्भार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्र, नांदेड पोलीस उप अधिक्षक श्री धरमसिंग चव्हाण, श्री राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री दत्ता केंद्रे, पोहेकॉ किशन चिंतोरे, पोना हणमंत बोरकर, ईश्वर जाधव, शेख मुजीब यांनी पार पाडली आहे.