प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांचा गोळीबारात मृत्यू

क्राईम

नांदेड,विशेष वृत्त:- नांदेड शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांचा उपचारादरम्यान झाला,या घटनेने नांदेड शहरात खळबळ उडाली असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नांदेड शहरात मागच्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात गँगवार,खंडणीराज,व गोळीबार रोखण्यात पोलिसांना आलेले अपयश आहे.त्यामुळे नांदेड शहरात सतत गोळीबार,खून आणि गँगवॉर घडत आहेत.

आनंद नगर जवळील नाईक नगर येथिल त्यांच्या घराच्या गेटजवळ दोन अज्ञात इसमानी बियाणी यांच्यावर जवळून गोळीबार केला.यात ते गंभीर जखमी झाले. ही घटना सकाळी अकरा वाजता सुमारास घडली.

मयत बियाणी यांना तात्काळ शहरातील ग्लोबल रूग्णालय येथे दाखल करण्यात आले.मात्र काही तासांनी डॉक्टरांनी संजय बियाणी यांना मयत घोषित केले. यापूर्वी नांदेड शहरात गोळीबार,गॅंगवर, खंडणी वसुली यातून व्यापारी यांच्यावर गोळी व खुनाच्या घटना घडल्या आहेत.

काही महिन्यांपूर्वी संजय बियाणी यांना खंडणीबाबत धमकी आली होती.त्यानंतर पोलिसांनी त्यांना एक सुरक्षा रक्षक दिला होता.मात्र काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षक काढून घेतल्यानंतर गोळीबार घडला.
बियाणी हे घरात जात असताना दोन जणांनी जुळवून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.यात त्यांचा मृत्यू झाला.नांदेड शहर व भोवतालच्या परिसरात संजय बियाणी यांचे मोठ्या प्रमाणात बिल्डरशिप सुरू होती.शहरातील नामांकित बिल्डर म्हणून त्यांची गणना होत होती.