महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण

क्राईम

 

नांदेड,बातमी24: निळा गावातील नादुरूस्त रोहीत्र दुरूस्त करून वीजपुरवठा पुर्ववत करत असताना तंत्रज्ञ राजेश वाघमारे यांना वीजग्राहक चांदू दिगंबर कदम व लखन रामा कंधारे यांनी डीपी फोडण्याचा प्रयत्न करत तंत्रज्ञ वाघमारे यांना शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुधवार दि.5 ऑगस्ट रोजी निळा गावातील नादुरूस्त झालेले दोन रोहीत्र दुरूस्त करून रात्री 11 वाजता गावातील वीजपुरवठा पुर्ववत करत असताना जिल्हापरिषद शाळा डीपीजवळ येवून लाईट ताबडतोब का सुरू केली नाहीस, असे म्हणत शिवीगाळ करत डीपीवर दगड फेकण्यास सुरवात केली. डीपी फुटेल दगड मारू नका असे सांगताच चांदु दिगंबर कदम याने गळा दाबत बेल्टने मारण्यास सुरवात केली. तसेच लखन कंधारे याने तोंडावर चापटा मारत तुझे हातपाय तोडून टाकतो असे म्हणत शिवीगाळ करत जबर मारहाण केली. या प्रकरणी लिंबगाव पोलीस ठाण्यात मारहाण गुन्हा करण्यात आला.