स्थानिक गुन्हे शाखेचे एएसआय वडजे लाच प्रकरणी जाळ्यात

क्राईम

नांदेड,बातमी24:-वाळूचे टिप्पर जाऊ देण्यासाठी दरमहा याप्रमाणे एका गाडीस 6 हजार रुपये नुसार दोन गाड्यांचे 12 हजार रुपये लाचेची मागणी करत तडजोडी अंती नगद दहा हजार रुपये स्वीकारतात सहायय पोलीस उपनिरीक्षक भानुदास शिवलिंग वडजे यास रंगेहात पकडण्यात आले.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार दि.13 जून रोजी केली.

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले,की तक्रारदार व त्याच्या एका मित्राचे वाळू,मुरूम व गिट्टीची वाहतूक करण्यासाठी हप्ता स्वरूपात 12 हजार रुपये दोन गाड्याचे याप्रमाणे देण्याची मागणी वडजे यांनी केली होती.त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काळशेवरनगर जवळील सहयोग कॅम्पस भागात लावलेल्या सापळ्यात वडजे पैसे घेताना रंगेहात सापडले.

ही कारवाई पोलीस उप अधीक्षक अशोक इप्पर,नानासाहेब कदम,जमीर नाईक,एकनाथ गगातिर्थ,जगनाथ अंनतवार,ईशवर जाधव,मारोती सोनटक्के यांच्या पथकाने केली.