गुंडगिरीला जशास तसे उत्तर देणार- एस.पी. मगर

क्राईम

नांदेड, बातमी24ः शहरातील गुंडगिरीला पोलिसांकडून जशास तसे उत्तर दिले जाणार असून यात कुणाची ही गय केली जाणार आहे. अशा इशारा पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी दिला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

कुख्यात गुंड विकास हटकर याने लोहा येथील बारा वर्षांच्या मुलाचे अपहरण करून वीस लाख रुपयांची खंडणी मागणी होती. या प्रकरणी पोलिसांनी त्या बालकाची सुटका करताना पळून जाणार्‍या विकास हटकर याच्यावर पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांनी पायात गोळी मारून जखमी केले. त्यामुळे जायबंद झालेला विकास हटकर पोलिसांच्या हाती लागला. या प्रकरणी अन्य दोन जणांना ही कालच अटक करण्यात आले होते.

या कारवाईच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात शनिवार दि. 8 रोजी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वेळी ते बोलत होते. मगर म्हणाले, की शहरात वाढत असलेली गुंडगर्दी खपवून घेतली जाणार नाही. गुंडगर्दीचे येणार्‍या काळात उच्चाटन केले जाईल, यासाठी जशास-तसे उत्तर मिळेल, असा इशारा मगर यांनी दिली. या प्रकरणातील आरोपींना मोक्का कायद्या लावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
——
दोन किलो सोन असल्यावरून अपहरण
अपहरण केलेल्या बालकाच्या आईकडे दोन किलो सोने असल्याची माहितीवरून अपहरण करण्यात आले.यासाठीच वीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र ते आरोपींकडून शेवटी 5 लाख रुपयांची मागणी केली गेली होती.
——
प्रशासनाकडून पोलिसांना बक्षीस
कालची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी केल्याबद्दल पोलिस प्रशासनाच्या वतीने स्थानिक गुन्हे शाखेला आर्थिक बक्षीस जाहीर केले.

1 thought on “गुंडगिरीला जशास तसे उत्तर देणार- एस.पी. मगर

 1. पोलीस अधीक्षक नांदेड यांचे अभिनंदन तसेच गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि त्यांचे सर्व पोलीस बांधवांचे अभिनंदन

  चिखलीकर साहेब आपण चिखली या गावाची शान आहात आपण चिखलीच्या मातीतून उमलले कमल आहात

  तसेच आपण लातूर जिल्हाची शान आहात चिखलीकराणा आपला सार्थ अभिमान आहे. असे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील गुंडागर्दी संपून सामाजिक न्याय जनतेला मिळेल . मी चिखलीकरांच्या वतीने व अहमद्पुर व चाकूर तालुक्याचे आमदार मा बाबासाहेब पाटील यांच्या

  वतीने व जिल्हासिरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक

  न्याय विभाग लातूर जिल्हा यांच्या वतीने अभिनंदन करीत आहे

  आपला नम्र

  मनोहर विठ्ठल गायकवाड

  जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक

  न्याय विभाग लातूर.

Comments are closed.