जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांनी केली तब्बल 130 किलोमीटर सायकलिंग

क्रीडा

नांदेड,बातमी24:- कोरोना काळात पूर्णपणे व्यस्त राहून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जीवाचे रान केलेल्या जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी मात्र शनिवारी नांदेडच्या सायकलिंग ग्रुपसोबत तब्बल 130 किलोमीटर सायकल चालवून सर्वांना सुखद धक्का दिला.

कोरोना लागण्याच्या तोंडावर डॉ.इटनकर यांची बदली नांदेड जिल्हाधिकारी म्हणून झाली होती. या काळात ते कोरोनाच्या संसर्गाचा ही सामना करावा लागला. क्रीडा क्षेत्राची आवड जोपासणाऱ्या मात्र त्याहीपेक्षा स्वतःला कामात व्यस्त ठेवणाऱ्या डॉ.इटनकर यांनी शनिवारी सकाळी नांदेड क्लब येथून सकाळी सात वाजता सायकलिंगला सुरुवात केली.

या सायकलिंग ग्रुपमध्ये डॉ.इटनकर यांच्या समवेत 35 जण हे नांदेड क्लबशी संबंधित सदस्य सुद्धा सहभागी झाली होते.नांदेड ते वसमत आणि वसमत ते औढा नागनाथ असा दोन टप्यात त्यांनी सायकलिंग प्रवास पूर्ण केला.औढा येथे बारा ज्योतीरलीगापैकी असलेल्या धार्मिक स्थळाचे दर्शन घेतले.त्यानंतर पुन्हा औढा नागनाथ ते वसमत मार्गे सर्व सायकलिंग ग्रुप नांदेड येथे पोहचला.130 किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी सहा ते सात तास लागले.या ग्रुपमध्ये सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त प्रवीण घुले यांच्या 30 ते 35 जणांचा समावेश होता. डॉ.इटनकर यांचा खेळाशी संबंधित उपक्रमात कायम सहभाग राहिला,असून ही बाब क्रीडा क्षेत्राशी संबंधित आवड जोपणाऱ्यासाठी आनंददायी पर्वणी असल्याचे बोलले जात आहे.