चार जणांचा मृत्यू तर दीडशे नवे रुग्ण

ताज्या बातम्या

 

नांदेड,बातमी24:- कोरोनाच्या संसर्गामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला. नव्याने कोरोनाचे दीडशे संक्रमित आले आहेत. 263 जणांनी कोरोनावर मात केली.तर 50 हे मृत्यूशी लढा देत आहेत.

सोमवार दि.28 रोजी 670 जणांची तपासणी करण्यात आली.494 निगेटिव्ह तर 154 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.यात आरटी पीसीआर चाचणीत 74 व अँटीजनमध्ये 80 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत 15 हजार 226 जनांपैकी 11 हजार 490 निगेटिव्ह आले आहेत,यातील 3 हजार 272 रुग्णांवर उपचार सुरू आहेत,तर 50 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे.
——–
चार जणांचा मृत्यू

नांदेड शहरातील पौर्णिमा नगर येथील 54 वर्षीय महिलेचा दि.27 रोजी, कंधार येथील 90 वर्षीय पुरुषाचा दि.27 रोजी, 55 वर्षीय पुरुषाचा दि.27 रोजी,तर 52 वर्षीय पुरुषाचा दि.28 रोजी मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 394 एवढी झाली आहे.