नांदेड जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश; आठ दिवस राहणार लागू

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः-काही दिवसांपासून जिल्ह्यातील नागरिकांना उत्सुकता आलेल्या संचारबंदीचे आदेश अखेर
पारित केले आहे. दि. 12 ते 20 जुलैपर्यंत हे आदेश कायम राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आली आहे.

कोरेानाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येला अटकाव घालण्यासाठी वेगवेगळया जिल्ह्यात संचारबंदी लावली जात आहे. या पार्श्वभूमिवर नांदेड जिल्हयात ही संचारबंदी लावण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. यासंदर्भाने सोमवारी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही संचारबंदीबाबत चर्चा झाली होती. यास अशोक चव्हाण यांनी हिरवाकंदील दिला होता.

त्याचदिवशी संचारबंदी लागणार होती. परंतु संचारबंदीचा विषय अचानकपणे लांबणीवर पडला. दि. 9 जुलैपासून संचारबंदी लागणार असल्याचे पुढे आले होते.परंतु त्या वेळी सुद्धा मागच्याप्रमाणे विषय रेंगाळत पडला होता. दि. 15 जुलै रोजी संचारबंदी लागणार असे सांगितले जात होते. परंतु अचानकपणे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दि.12 जुलैपासून ते 20 जुलैपर्यंत संचारबंदी असेल असे कळविले आहे.


बातमी24.कॉम चा परिणाम

नांदेड जिल्हाधिकारी लॉकडाऊन संदर्भात अंडरप्रेशर ऑफ पॉलिटीक्स अ‍ॅण्ड पॉलिटीशियन या मथळयाखाली गुरुवारी रात्री वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तांमध्ये जिल्हाधिकारी हे राजकीय उद्देशापोटी संचारबंदी आदेश 15 नंतर लावणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे मोठी खळबळ उडाली होती. या वृत्ताची दखल घेत 15 ऐवजी 12 जुलैपासून संचारबंदी जिल्ह्यात असेल असे आदेश दिले.