या भागातील दोन कोरोनाचे रुग्ण वाढले

ताज्या बातम्या

 

नांदेड,बातमी24:- बुधवारी सकाळी 41 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यात 37 निगेटिव्ह,दोन अहवाल अनिर्णित तर दोन अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 323 इतकी झाली आहे.

आज आलेल्या नमुन्यातील 2 रुग्ण हे देगलूर नाका व गुलजार बागेतील असून दोघांचे वय हे 67 इतके आहे. मनपा प्रशासनाने माजी महापौर व नगरसेवक पुत्राच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे अहवाल घेण्यात आले, असून या अहवालाची प्रतीक्षा लागली आहे.

मंगळवारी सुद्धा चार जनांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते,यात एक डॉक्टरचा समावेश आहे. तर सात रुग्ण बरे झाले होते.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्या 323,बरे झालेले रुग्ण 245,उपचार घेत असलेले 64 तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे.