बिलोली येथील पत्रकार कोरोना पॉझिटीव्ह; त्या पत्रकाराचा बेजबाबदारपणामुळे अनेकजण क्वॉरंटाईन

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः- कोरोनाच्या संसर्ग आतापर्यंत पोलिस, डॉक्टर मंडळींना आतापर्यंत झाला असताना पत्रकार ही यास अपवाद राहिले नसून बिलोली येथील पत्रकारास कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे, कोरोनाचा स्वॅब देऊन या पत्रकाराने एका सार्वजनिक कार्यक्रम सहभाग घेतला. त्यामुळे काल रात्रीपासून कार्यक्रमाला उपस्थितीत राहिलेल्या पत्रकारामुळे आयोजकांना होम क्वॉरंटाईन व्हावे लागले आहेत.

कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वत्र वाढत आहे.यात सायंकाळी आलेल्या अहवालात काही बिलोली येथील एकाचा स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आहे.स्वॅब पॉझिटीव्ह आलेला पत्रकार गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारांना मास्क वाटप कार्यक्रमात ही सहभागी झाला. विशेष म्हणजे वैद्यकीय अधीक्षकांना केअर सेंअर येथे त्या पत्रकारास क्वॉरंटाईन होण्याचा सल्ला दिला होता. परंतु वैद्यकीय अधीक्षकांचे न ऐकता होम क्वॉरंटाईन झाले.

होम क्वॉरंटाईन न राहता गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या एका मास्क वाटपाच्या कार्यक्रमातही ते सहभागी झाले. सायंकाळी त्यांचा स्वॅब पॉझिटीव्ह आल्याची माहिती मिळाल्यानंतर कार्यक्रमाचे आयोजक, तहसीलदार व पत्रकार मंडळींना धक्का बसला. कोरोना पॉझिटीव्ह पत्रकार त्या कार्यक्रमात येऊन बसल्याने वैद्यकीय अधीक्षक, तहसीलदार, माजी नगराध्यक्ष व काही पत्रकारांना क्वॉरंटाईन करण्यात आले, असून त्यांचे स्वॅब तपासणीला पाठविण्यात आले आहेत.
——
वैद्यकीय अधीक्षकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष
कोरोना पॉझिटीव्ह आलेला पत्रकार हा यापूर्वी बिलोली येथे पॉझिटीव्ह आलेल्या दोन जणांच्या संपर्कात आले होते. त्यामुळे या पत्रकारास क्वॉरंटाईन होण्याची सूचना दिली होती. परंतु सूचनेची पालन न केल्यामुळे सहा जणांना क्वॉरंटाईन होण्याची वेळ आली आहे. स्वॅब घेतलेल्या रुग्णांनी रिपोर्ट येईपर्यंत स्वतःहून क्वॉरंटाईन होण्याच्या सूचना वैद्यकीय अधीक्षकांनी केल्या आहेत.