कोरोनाचा आकडा तिनशेच्या आसपास; दिवसभरात 10 रुग्ण पॉझिटीव्ह

ताज्या बातम्या

नांदेड, बातमी24ः– बुधवारच्या विश्रांतीनंतर गुरुवारी दहा कोरोनाचे रुग्णांचे आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 296 इतकी झाली आहे.
बुधवारी रात्री जिल्हयात चार तर गुरुवारी सहा अहवाल पॉझिटीव्ह आले. दि. 18 जून रोजी 226 अहवाल तपासण्यात आले. यामध्ये 198 अहवाल निगेटीव्ह आले. तर दहा अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. अहवाल पॉझिटीव्ह आलेले रुग्णांमध्ये पाच पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे.

सोमेश कॉलनीमधील 75 वर्षीय पुरुष, परिमल नगर33 वर्षीय, चैतन्य नगर 43, भगतसिंघरोड येथील 24 तर औरंगाबादवरून आलेल्या एका 33 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर महिलांमध्ये कामठा येथील दोन महिला, असून त्यांचे वय. 19, 22, गजानन कॉलनी तरोडा बु्र. 42 वर्षीय महिला, मुखेड येथील विठ्ठल मंदिर येथील 55 तर हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील 55 वर्षीय महिलेचा सुद्धा समावेश आहे. दिवसभराच्या काळात एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.
—–
रुग्ण संख्या -296
कोरोना मुक्त-181
उपचार घेणारे-102
मृत संख्या-13