पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अखेर मंत्री राठोड यांचा राजीनामा!

देश

मुंबई,बातमी24:पूजा राठोड मृत्यू प्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड त्यांच्यावर विरोधीपक्ष यांनी सरकारवर दबाव निर्माण केला होता, अखेर रविवारी संजय राठोड यांनी राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला.मात्र याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

परळी वैजनाथ येथील टिकतोक फेम राहिलेल्या पूजा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी अनेक मोबाईल ध्वनिफीत समोर आली होती.तसेच मयत पूजा सोबतचे अनेक फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
यावरून भाजपने राठोड यांच्या राजीनामा मागणी केली होती.

हे प्रकरण मागच्या महिनाभरापासून सुरू होते.मधल्या काळात पोहरादेवी येथे हजारो लोकांची गर्दी जमवित कोरोनाच्या नियमांच्या भंग केल्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती.त्यानंतर राठोड यांच्या राजीनामा शक्यता अधिक वाढली होती.रविवारी सहपत्नीक वर्षा बंगल्यावर जाऊन राजीनामा सुपूर्द केल्याचे वृत्त वाहिन्यांनी प्रसिद्ध केले आहे.