श्रीवेद मल्टीस्टेट संस्थेच्या चेअरमनपदी मारोतीराव कंठेवाड यांची निवड

देश नांदेड

नांदेड, बातमी24:- शहरातील सुप्रसिद्ध आणि ग्राहकांच्या विश्वासात पात्र ठरलेली श्रीवेद मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. नांदेडची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी संचालकांची पंचवार्षिक निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत प्रसिद्ध उद्योजक मारोतीराव कंठेवाड यांची चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार खात्यातील सहाय्यक निबंधक पी.जी. पपूलवार यांची उपस्थिती होती.

संचालक मंडळात उद्योजक मारोतीराव कंठेवाड, गंगाधरराव पांडे (माजी वित्त अधिकारी महावितरण), शंकरराव चांडोळकर (माजी सरव्यवस्थापक, एन.डी.सी.सी. बॅंक नांदेड), एस.जी. करपे (मा.संचालक, मुंबई व कोकण महावितरण), आर.आर. कांबळे (मुख्य अभियंता, महावितरण बीड), नागोराव अनंतवाड (सचिव, व्यापारी असोसिएशन नांदेड), बाबुराव तोतेवाड (अध्यक्ष तांत्रिक कर्मचारी मंडळ, महावितरण परभणी), नामदेव मिठेवाड (माजी पोलीस अधीक्षक नांदेड), उद्योजक अमित कंठेवाड, सौ. शर्मिला कंठेवाड, सौ. सुमन नाईनवाड यांची संचालक म्हणून निवड करण्यात आली. यानंतर श्रीवेद मल्टीस्टेट को.ऑप. क्रेडीट सोसायटीच्या वतीने छापण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.

संस्थेच्या ठेवीदार, भागधारक, ग्राहकांना सदर दिनदर्शिकेचे वितरण करण्यात आले. यावेळी उद्योजक पंढरीनाथ कंठेवाड, बालाजी कंठेवाड, संस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, अल्प ठेव प्रतिनिधी, महिला बचत गट आदींची उपस्थिती होती. शेवटी सौ. सविता कंठेवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले .