मुखेडसह नांदेड शहरात सकाळच्या अहवालात रुग्ण वाढ

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- नांदेड जिल्हयातील घेण्यात आलेल्या 28 नमुन्यांचा अहवाल गुरुवार दि.2 जुलै रोजी आले,असून यात पाच रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तीन पुरुष व 2 महिलांचा असून नांदेड चार व मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथील रुग्णाचा समावेश आहे.

आजच्या 28 अहवालात 14 निगेटिव्ह,09 अनिर्णित व 05 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये निझाम कॉलनी येथील साठ वर्षीय महिला, खुडब नगरमधील चाळीस वर्षीय महिला, जुना मोढा येथील 36 वर्षीय पुरुष, हैदरबाग येथील 53 वर्षीय पुरुष व मुखेड तालुक्यातील बेटमोगरा येथे 30 युवक ही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या 397 इतकी झाली आहे.