संचारबंदीच्या आदेशात सुधारणा; काय आहेत जिल्हाधिकार्‍यांचे नवे निर्देश जाणून घ्या

नांदेड

नांदेड, बातमी24ः-संचारबदींचे आदेश रविवारी रात्री बारा वाजल्यापासून लागू होणार आहे. जुन्या आदेशात संचारबंदीचा कालावधी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत सुट देण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यात सुधारणा करत सकाळी सात ते दहा अशी तीन तासांचीच सुट असणार असल्याचे जाहीर केले आहे.

 

इतर जिल्ह्यांप्रमाणे नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात यावी, अशी मागणी होत होती. जनतेच्या मागणीचा विचार करता, जिल्हाधिकारी डॉ. इटनकर यांनी शुक्रवार दि. 10 जुलै रोजी आदेश काढताना संचारबंदी दि. 12 जुलै ते 20 जुलै अशी असणार असल्याचे जाहीर केले. यासाठी 19 प्रकारची नियमांवली करण्यात आली. नियमांवलीच्या बाहेर संचारबंदीच्या काळात कुणालाही जाता येणार नाही. मात्र यासाठी सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंतची मुभा देण्याचे निर्देश होते.

सर्वच्या सर्व प्रकारची नियमांवली कायम ठेवण्यात आली असली, तरी वेळेच्या बाबतीत अधिक कठोर निर्णय प्रशासनाने घेतला, असून त्यासंबंधीचे निदेर्श सुधारीत आदेशान्वये देण्यात आले आहे. सकाळी सात ते दहा या तीन तासांच्या कालावधीत घरपोच विक्री, सेवा देण्याची मुभा असणार आहे. भाजीपाला, फ ळे विक्री एका ठिकाणी न करता हातगाडयव्दारे गल्ली, कॉलनी तसेच दुध विक्रेत्यांना सुद्धा एकाच ठिकाणी थांबून दुध विकता येणार नाही. पाणी विक्री व गॅसची सुद्धा सकाळी दहा वाजेच्या आतच घरपोच सेवा देता येणार आहे.

——
जिल्ह्यातील बँकांचे कर्मचारी हे त्यांचे अंतर्गत कामकाज बँकेत उपस्थित राहून करू शकणार आहेत. तसेच शासकीय कार्यालयांचे शासकीय व्यवहार सुद्धा चालू राहतील. मात्र इतर कोणत्याही ग्राहकांना बँकेत येण्यास प्रतिबंध राहिल.