वाढीव वीज बिला विरोधात भाजपाचे उद्या आंदोलन

नांदेड

नांदेड,बातमी24ः-टाळेबंदीच्या काळात संपूर्ण व्यवहार ठप्प असताना वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांकडे भरमसाठ वीज बिलाची मागणी केली आहे. वीज वितरण कंपनीच्या या धोरणामुळे जनतेमध्ये नाराजी असून वीज बिल माफ करावे या मागणीसाठी भाजपा महानगर च्या वतीने गुरुवार दि. 2 जुलै रोजी सकाळी 11 वाजता वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा महानगर अध्यक्ष प्रवीण साले यांनी दिली.

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात तीन महिने टाळेबंदी होती . त्यामुळे संपूर्ण व्यवहार होते. असे असतानाही वीज वितरण कंपनीने माहे एप्रिल ते जून या महिन्याचे तीस ते चाळीस हजाराच्या आसपास एकत्रित बिल दिले आहे. कुठलीही सरासरी गृहीत न धरता अंदाजे हजारो रुपयांचा भुर्दंड जनतेच्या माथी मारला आहे.

राज्य सरकारमधील मंत्र्यांनी तर आधी वीज बिल माफ करण्याची घोषणा केली होती. तसेच नंतर 100 युनिटपर्यंत माफी देण्यात येईल असेही सांगितले होते. टाळेबंदीच्या काळात सहकार्य करणार्‍या जनतेलाच धोका देण्याचे काम राज्य सरकार व वितरण कंपनीने केले आहे. भाजपा महानगरच्या वतीने वीज वितरण कार्यालयासमोर 2 जुलै रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा महानगराध्यक्ष प्रवीण साले यांनी केले आहे.