कार नदीत पडल्याने दोघांचा मृत्यू

नांदेड

नांदेड, बातमी24ः मालेगाव रोडवरील पासदगाव येथील असना नदीवरील पुलावरून कार पाण्यात पडली. या झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी नागरिकांच्या समोर आली.

एम. एच. 01एच.व्ही. 6007 क्रमांकाची कार मालेगाव मार्गे नांदेडकडे येत असताना पुलावरून खाली कोसळली. या घटनेत एक पुरुष व एक महिला जागीच ठार झाले. यातील मयत पुरुषाचा ओळख पटल, मात्र मयत महिलेची ओळख पटू शकली नाही. कारमधील मयत पुरुषाचा नाव हरविंदरयारसिंग चढढा असे आहे. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
——
पुलाच्या कठडे उभारणीकडे दुर्लक्ष
पासदगाव येथील असना नदीवरील पुलाचे कठडे गळून पडले आहेत. त्यामुळे या नदी पुलावर कायम अपघाताच धोका असतो. विशेष म्हणजे, या भागात शाळा पण आहे. संभाव्य धोका पाहता बांधकाम विभागाने लक्ष देणे महत्वाचे ठरणार आहे.