दुपारपर्यंत दोन सापडले एक दगावला

नांदेड

नांदेड, बातमी24ः- दुपारपर्यंत 76 नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला आहे. यामध्ये दिवसभराच्या काळात तीन रुग्ण कोरोनाचे पॉझिटीव्ह आले आहेत. यातील पीरबुर्‍हाण नगर भागात राहणार्‍या एका कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शनिवारी सकाळी आठरा नमून्यांचा अहवाल तपासण्यात आला आहे. यामध्ये सतरा नमूने निगेटीव्ह आले तर एक अहवाल त्या रुग्णांचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटीव्ह आला आह. त्यामुळे जिल्ह्यात मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 14 इतकी झाली आहे. तर दुपारी प्राप्त झालेल्या 58 अहवालांपैकी 45 अहवाल निगेटीव्ह, 11 अहवाल अनिर्णीत ठेवण्यात आले तर 2 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे.

पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांमध्ये रहमत नगर येथील 48 वर्षीय इसम व भगतसिंग रोडवरील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे. या महिलेच्या कुटुंबातील एक सदस्य यापूर्वीच पॉझिटीव्ह आला होता.तर रहमतनगर येथील एक पॉझिटीव्ह आलेला रुग्ण हा भांडे व्यापारी आहे.