काम चुकार चार शिक्षकांची वेतनवाढी रोखण्याचे आदेश;सीईओ ठाकूर यांच्या मुखेड दौरा

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- गृहभेटीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याप्रकरणी मुखेड तालुक्यातील चांडोळा येथील चार शिक्षकांची वेतनवाढ थांबविण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी वर्षा ठाकूर यांनी दिले.

वर्षा ठाकूर यांनी मुखेड तालुक्याचा दौरा दि.17 रोजी केला.या दौर्यादरम्यान त्यांनी चांडोळा येथील विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन संवाद साधला,असता त्यांनी आपल्या शाळेतील शिक्षक भेटीस आले होते काय?अशी विचारणा केली असता,विद्यार्थ्यांकडून नकारात्मक उत्तरे आली.यावरून वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषद शिक्षक लता तोटरे,वसंत शिंदे,व्यंकट सोमवारे व आत्माराम खडगावे या वरील चार शिक्षकांची वेतनवाढ रोहण्याचे आदेश दिले. मुखेड पंचायत समिती गट विकास अधिकारी पांडुरंग भालके यांच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी उपस्थिती होती. पंचायत समिती कार्यालयात आयोजित बैठकीत विविध योजनांचा आढावा घेत वेळेवर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.