मुख्य लेखाधिकारी शिवप्रसाद चन्ना यांचा लेखा संघटनेकडून सत्कार

नांदेड

नांदेड,बातमी24:-जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून शिवप्रसाद चन्ना हे नुकतेच रुजू झाले असून त्यांचा सत्कार लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आला. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सय्यद मिनाझ यांनी दिली.

तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकारी रावसाहेब कोलगणे यांच्या जागी चन्ना यांची बदली झाली आहे.यानिमित्ताने लेखा कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी लेखाधिकारी व्हि.एस.सुलेवाड,पवन तलवारे,उत्तम टोम्पे,भानुदास केंद्रे, उत्तम वाढवे,प्रताप रायगोल,किशोर जाधव, साहेबराव देशमुख,संतोष कुलकर्णी,विजयसिह चव्हाण,कीर्ती बिवळे, दीपक वाघमारे आदींची उपस्थिती होती.