जिल्हाधिकारी डॉ.इटनकर यांच्या फोटोग्राफीची सोशल मीडियावर चर्चा

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- नांदेडचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या फोटोग्राफीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होत असल्याचे बघायला मिळत आहे. डॉ.इटनकर यांनी व्यस्त काम कामकाजातून स्वतःसाठी वेळ काढत स्पोर्ट जीपवर चढून फोटोग्राफी करण्याचा आनंद लुटला.

नांदेड जिल्हाधिकारी म्हणून येताच डॉ.विपीन इटनकर यांच्या पाठीमागे कोरोनाच्या संसर्ग नियंत्रणाचे अवघड काम लागले.सुरुवातीचे काही महिने यात गेले.

त्यानंतर शासनस्तरावर कामाला सुरुवात झाली,जिल्ह्यातील दौरे, मंत्रालयस्तरावरील बैठका,आता ओला दुष्काळ,यात मंत्र्यांचे दौरे ही लागले आहेत.या व्यस्त वेळेतुन वेळ काढत डॉ.इटनकर यांनी लाल रंगाच्या स्पोर्ट जीप चालविण्याचा आनंद घेतलाच शिवाय भरभरून फोटोग्राफी सुद्धा केली.या संबंधीचे फोटोग्राफस लक्ष वेधून घेत आहेत.