वादग्रस्त प्र.कार्यकारी अभियंता बारगळचा उदोउदो करणारे तोंडघशी!

नांदेड

जयपाल वाघमारे

नांदेड,बातमी24:-काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागात वादग्रस्त समाज कल्याण अधिकारी राहिलेल्या सुनील खमीतकर यांच्या बेशरम कारभाराला संपूर्ण जिल्हा वैतागला होता.तसेच पाणी पुरवठा विभागात प्रभारी कार्यकारी अभियंता पदावर राहिलेल्या बारगळ यांच्या वादग्रस्त कारभाराने जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीही वैतागलेले असताना जिल्हा परिषद मधील काही पदाधिकारी आणि मोजक्या अधिकाऱ्यांनी बारगळ यांचा केलेला उदोउदो हा त्यांनाच तोंडघशी पडणारा ठरला आहे.अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील देगलूर येथे उपअभियंता असलेल्या आर.एस.बारगळ यांनी प्रभारी कार्यकारी अभियंता होता यावे, यासाठी बारगळ यांनी एका पदाधिकारी यांचे जोडे डोक्यावर घेण्याची तयारी दर्शविली.तेव्हा कुठे बारगळ यांना खुर्चीवर बसता आले. बारगळ यांचा प्रकार हा लाज विकून खाल्यासारखाच होता.तो आजतागायत कायम आहे.

 

कामात कराव्या लागत असलेल्या स्वाक्षरीसाठी टक्केवारी हा महामंत्र स्वीकारलेल्या बारगळ यांना कामे प्रामाणिकपणे करण्याकडे लक्ष न देता,स्व-उद्दिष्ट साध्य करण्यावर भर दिला. या कामात गोळा करायला स्वतःची यंत्रणा उभी केली.नियमबाह्य कामाला विरोध करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचा सूड उगवायला बारगळ यांंनी कमी केलंं नाही.

या सगळ्या प्रकारामुळे बारगळ जिल्हाभरात वादग्रस्त ठरले.जिल्ह्यातील आमदारांपासून ते सरपंच यांना बारगळ यांच्या बालिश कारभाराची झळ बसली.जिल्हा परिषद सदस्य ही त्यांच्या आडमुठ्या वागणुकीमुळे त्रस्त झाले.त्यामुळे प्रत्येक जीबी आणि स्थायी समिती बैठकीत पदाधिकारी व सदस्य हे  बारगळ यांचा पाणउतारा करत नाहीत,असे कधी होत नाही.

कामा आडून काही न देणाऱ्यास नियम दाखवाचे आणि  स्वतःचे मेडिकल बिल नियमबाह्यपणे काढण्यासाठी अधिकाऱ्यास पैसे मोजायचे,हा प्रकार बारगळ यांचा सर्वसूत आहे. त्यांच्या नियमबाह्य कारभारावर किनवट येथील सनदी अधिकारी किर्तीकुमार पुजार यांनी बारगळ यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी प्रस्ताव जिल्हा परिषदेला दिला.मात्र तो प्रस्ताव तसाच धूळखात पडून आहे.याकडे प्रशासन जाणीवपूर्वक दूर्लक्ष करीत आहे.

गत वर्षीची पाणी टंचाईचे 10 कोटी आखर्चित राहिलेले असताना या वर्षीची पाणी टंचाई कामे सुरू झालेली नाहीत. बारगळ यांच्या दिरंगाईचा परिणाम व भोंगळ कारभारामुळे एका सरपंचाने संचिका जाळून निषेध नोंदविला. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जलसंधारण समिती बैठकीत बारगळ यांनी बैठकीला जाणीवपूर्वक गैरहजेरी लावून वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांना गुमानत नसल्याचे दाखवून दिलं.ज्याच्या जीवावर बारगळ यांनी सर्व नाटक खेळले तेच काही पदाधिकारी व अधिकारी त्या बैठकीत तोंडावर आपटले.त्यामुळे पदाधिकारी हे जाम रागात आले.

त्या बैठकीत  एक वेतन कपात करण्याबाबत शासनाला कळविले जाईल यावर अधिकारी मंडळींनी मात्रा चढविली.ज्या अधिकारी व पदाधिकारी यांनी बारगळ यांनी जे करील तो कायदा मानला, बारगळ हे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी यांच्या डोक्यावर मिरे वाटायला लागल्याचे त्यांनीच दाखवून दिले.त्यामुळे जे कुणी वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी हे बारगळ यांच्या नावाने उदोउदो करत होते, त्यांनाच बारगळ यांनी तोंडघशी पाडून त्या अधिकारी व पदाधिकारी यांची लायकी काढली असाच त्याचा अर्थ होतो.