शहराच्या बहुतांशी भागात कोरोना;13 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश

नांदेड

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24ः- नांदेडमध्ये शनिवारी दि. 13 जून रोजी कोरोनाचे 22 रुग्ण सापडल्याचे वृत्त बातमी24.कॉम ने काही तासांपूर्वी प्रकाशित केले होते. हे वृत्त तंतोतंत खरे ठरले आहे. आज सापडलेल्या 22 रुग्णांमध्ये 13 पुरुष व 9 महिलांचा समावेश असून बहुतांशी रुग्ण हे भाग्यलक्ष्मी बँकेचे कर्मचारी असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. तर आज 8 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शनिवारी 97 पैंकी 62 अहवाल निगेटीव्ह तर 22 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यामध्ये तेरा पुरुष व नऊ महिलांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर पंजाबभवन येथील पाच व शासकीय रुग्णालय येथील 3 अशा आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोणत्या भागात किती रुग्ण पुढील प्रमाणे
परिसर—–पुरुष—-स्त्री —–वय
चिखलीवाडी–01—01—-55, 48
विजय कॉलनी–00–01—-55
दीपनगर—–01—-00—-49
एचआयजी कॉलनी–00–01–48
झेंडा चौक—–00—-01—-45
स्वामी वि.नगर–01—-00—-34
सोमेश कॉलनी–01—01—-51,49
पद्मजा कॉलनी—00—01—-43
सिडको——-01—-01—-47
यशवंत नगर—-01—-00—-35
विणकर कॉलनी–01—-00—-30
भाग्यनगर रोड—-00—-01—31
ज्ञानेश्वर नगर—01—–00—-35
न्यायनगर—–01—–00—-30
श्रीकृष्णनगर तरोडा–01–00—31
विश्वदीनगर—-01—–00—-25
महावीर चौक—01—–00—-67
इतवारा——01——00—-30
कामठा——01——00—–29
——–
जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी
कोरोनोच्या रुग्णांची संख्या—256
कोरोना मुक्त रुग्णांची संख्या–168
उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्या–75
आतापर्यंत मरण पावलेले रुग्ण–13