कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 125;एकाच मृत्यू

नांदेड

 

नांदेड,बातमी24:-कोरोनाच्या रुग्ण संख्येत गुरुवार दि.4 रोजी झपाट्याने वाढ झाली.आजच्या अहवालात 125 नवे रुग्ण आढळून आले,तर एका रुग्णाचा कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाला.

जिल्ह्यातील 1 हजार 799 अहवाल तपासण्यात आले आहेत.यात1हजार 686 निगेटिव्ह तर 125 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.त्यामुळे 603 जनांचा आतापर्यंत कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यूची नोंद झाली आहे.

सध्या नांदेड जिह्यात 698 जणांवर उपचार सुरू असून त्यातील 18 जणांची प्रकृती गंभीर आहे.मागच्या दि.28 एप्रिल पासून 24 हजार 39 जण पॉझिटिव्ह आले. यातील 22 हजार 516 जण कोरोना मुक्त झाले.