मनपा हद्दीत कोरोनाचे रुग्ण वाढले

नांदेड

नांदेड, बातमी24ः- नांदेड शहरात रविवार व सोमवार कोरोनाने साखळी तोडलेली असताना मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये नव्याने 14 रग्णांची भर पडली आहे. त्यामुळे 280 इतकी झाली आहे.

मंगळवार दि. 16 जून रोजी 180 नमून्यांचा अहवाल आला आहे. यामध्ये मनपाच्या हद्दीमध्ये 14 रुग्णांची भर पडली आहे. सोमवारी रात्री 118 नमून्यांचा अहवाल प्राप्त झाला होता. यामध्ये एकटया मुखेडमधील विठ्ठल मंदिर परिसरातील यापूर्वीच्या कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नव्याने चार रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णसंख्या 266 झाली होती. यात महापालिकेच्या हद्दीतील 14 रुग्ण वाढले, असून जिल्ह्यातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 280 इतकी झाली आहे. यामध्ये त्या महिला बँकेच्या कर्मचार्‍यांच्या संपर्कातील बारा जणांचा समावेश आहे.
——
जिल्ह्यातील कोरेानाची रुग्ण संख्या-280
कोरोनामुक्त झालेले रुग्ण संख्या-177