पीक कर्ज तातडीने वाटप करा : प्रविण साले

नांदेड

नांदेड, बातमी24:-
अद्यापपर्यंत शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी पीक कर्जाचे वाटप झाले नाही. कर्ज वाटप न झाल्यामुळे पेरणी कशी करावी या चिंतेत शेतकरी सापडला असून शेतकर्‍यांना खरीप हंगामासाठी कर्जाचे वाटप तातडीने करावे अशी मागणी भाजपा महानगराक्ष प्रविण साले यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. भाजपच्या वतीने  आज जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आंदोलन करण्यात आले.

सरकारच्या बांधावर खत आणि बियाणे योजनेचा बोजवारा उडाला आहे. कापसाची खरेदी न झाल्याने कापूस घरामध्ये पडून आहे. कमी भावात कापुस विकावा लागत आहे. कापुस, चणा, तुरीचे पैसे आलेले नाहीत त्यामुळे शेतकरी अर्थिक अडचणीत सापडला असून सावकारांकडे दागिणे गहाण ठेवण्याची वेळ आली आहे.

फेबु्रवारी महिन्यात भाजपाने आंदोलन केल्यानंतर शेतकर्‍यांना प्रोत्साहपर 50 हजार रुपये निधी देण्याची घोषणा सरकारने केली होती. परंतु ती घोषणा अंमलात आली नाही. तसेच बांधावर जावून कोरडवाहू शेतकर्‍यांना 25 हजार तर फळबागा असलेल्या शेतकर्‍यांना 50 हजार रुपये देण्याच्या घोषणेचा सरकारला विसर पडला आहे. आंदोलनकर्त्या भाजपाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करुन सुटका केली.

यावेळी मिलिंद देशमुख, विजय गंभीरे, दिलीप ठाकुर, अशोक पा. धनेगावकर, व्यंकट मोकाले, बाबुराव शिंदे कासारखेडकर, उभनलाल यादव, कुणाल गजभारे, प्रभु कपाटे, सुनिल चव्हाण, अनिल हजारी, शितल खांडील, सुर्यकांत कदम, सतीश बेरुळकर, बाळु लोेंढे, मारोती वाघ, सुनिल भालेराव, संदिप कर्‍हाळे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.