रात्रीतून मृत्यू संख्या वाढली

नांदेड

 

नांदेड,बातमी24: कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी वाढत आहे.जिल्ह्यात रात्रीतून पाच रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नांदेड जिल्ह्यात बुधवारी चार जणांचा मृत्यू झाला होता. तर रात्रीतून सकाळपर्यंत पाच रुग्ण मृत्यू पावले आहेत. यामध्ये बिलोली तालुक्यातील कोल्हेगाव येथील 17 जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या 60 वर्षीय रुग्णांचा रात्री साडे आठ वाजता मृत्यू झाला.लोहा येथील 77 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मध्यरात्री मृत्यू झाला.

मुखेड येथील वाल्मिक नगर भागात राहणाऱ्या 56 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला.देगलूर तालुक्यातील सुगावा येथील 55 वर्षीय रुग्णाचे पहाटे पाच वाजता मृत्यू झाला. तसेच परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील 54 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 55 झाली आहे.मरण पावले सर्व जण हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैधकीय रुग्णालयात उपचार घेत होते. असे सांगण्यात आले.