जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचा शासनाकडून गौरव

नांदेड

नांदेड,बातमी24:-कोविड-19 या राष्ट्रीय आपत्तीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य(सेवा) बजावल्याबद्दल नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांचा प्रशस्तिपपत्र देऊन देऊन गौरव करण्यात आला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री राजेश टोपे, या विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावार, सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास व आरोग्य सेवा विभागाचे आयुक्त डॉ. रामासस्वामी एन. यांच्या स्वाक्षरी असलेले प्रशस्तिपत्र डॉ. बालाजी शिंदे यांना देण्यात आले.

मागच्या पावणे दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथ रोगाने जगभर थैमान घातले आहे. या काळात कोरोनाच्या दोन लाटा येऊन गेल्या. हा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळया उपक्रम राबवून ग्रामीण भागात कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. या काळात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे हे स्वतः कोरोनाच्या संसर्गामुळे बाधित झाले होते.प्रकृती खालावली, तरी त्यातून ते बाहेर पडून पुन्हा या आपत्तीतून नागरिकांचे जीव-प्राण वाचले पाहिजे, त्यांना प्राथमिक स्तरावर उपचार भेटले पाहिजे, यासाठी प्रयत्नशील राहिले.

जिल्ह्यातील 63 प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रस्तरावर वैद्यकीय आरोग्य अधिकारी, परिचारिका सह अन्य इतर आरोग्य विभागाचे कर्मचार्‍यांनी गावपातळीवर जोखीम पत्कारून या आपत्तीचा सामना केला, शिवाय ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य सुद्धा आबाधित राखण्यात महत्वाची भूमिका बजावली, या कामाचे सर्व श्रेय हे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना जाते असे डॉ. बालाजी शिंदे यांनी आवर्जून सांगितले.

या कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात संसर्ग पसरू नये, यासाठी कोविड पूर्व परिस्थिती व नियोजन करताना वयस्क नागरिकांच्या आरोग्याला प्रधान्य देण्यात आले. यासाठी कोविड हेल्पलाईन सुरु करण्यत आली.स्थलांतरित व्यक्तींचा गावो-गावी सर्वे करण्यात आला, टेस्टींग वाढविण्यात आल्या, शासकीय आरोग्य संस्थेचे आरोग्य संस्थांचे बळकटीकरण केले, कोविड प्रसार-प्रतिबंधकात्मक उपाय केले गेले, यात विलगीकरण, सहवासितांची शोधमोहीम, रुग्णवाहिकांचे बळकटीकरण, कोविड केअर सेंटर अशा विविध उपाय योजना करता आल्या, या कामी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकुर-घुगे यांचे महत्वाचे योगदान मिळाले, त्यामुळे कोरोनाची साथरोग नियंत्रणात आणता येऊ शकल्याचे डॉ. बालाजी शिंदे यांनी सांगितले.याबद्दल त्यांनी शासनाचे सुद्धा आभार व्यक्त केले.