जिल्हा परिषदेच्या त्याच जागेवर पुन्हा अतिक्रम

नांदेड

नांदेड,बातमी24:- जिल्हा परिषदेच्या मालकीच्या करोडो रुपयांच्या जागेवर अतिक्रमण वाढले आहे. तरोडा येथील सर्व्हे नंबर 125मधील जागेवर पुन्हा अतिक्रमण करण्यात आले,असून जिल्हा परिषद पदाधिकारी व अधिकारी मात्र मूग गिळून गप्प आहेत.अशाच महत्वाच्या जागा गिळकत करत असतील,तर जिल्हा परिषद आर्थिक दृष्टया कंगाल होऊन जाईल.

जिल्हा परिषद मालकीच्या नांदेड शहर तसेच जिल्हाभर जागा आहेत.जिल्हा परिषद स्व-उत्पन्न बोटावर मोजण्या इतके राहिले नाही, अशा जागांचा उपयोग बीओटी य तत्वावर बांधले तर जिल्हा परिषदेलाही मोठा आर्थिक स्रोत मिळू शकते,शिवाय रिकाम्या जागेवर होत असलेले अतिक्रमण कमी होऊ शकते, या बाबत जिल्हा परिषदस्तरावर चर्चा होत असते,मात्र अमलबजावणी होत नाही.त्यामुळे अतिक्रमण वाढत आहे.याबत जिल्हा परिषद स्तरावरून कुठलीही कारवाई होत नाही.

सध्या तरोडा नाका येथील सर्व्हे क्रमांक 125 जागेवर पश्चिम दिशेकडून मोठे कॉम्प्लेक्स ते ही अनधिकृत उभारले आहे.आता उत्तरेकरून टिन शेडचे गाळे बांधण्यात आले,तेही रातोरात उभारण्यात आले. या सगळ्या याकडे जिल्हा परिषद लक्ष द्यायला तयार नाही.याबत राजू श्रीमनवार यांनी सीईओ कार्यालयात निवेदन दिले.