कोरोनात बाजार हाऊसफुल;संचारबदींचे गणित बिघडल

नांदेड

नांदेड, बातमी24ः- जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात बाजारातील होणारी विक्रमी गर्दी कोरोनाचा संसर्ग वाढविणारी ठरणार आहे. संचारबंदीचे अंमलबजावणी सगळीकडे होत असताना बाजारातील गर्दीवर मात प्रशासनाला नियंत्रण आणता आलेले नाही. त्यामुळे कोरोनातत बाजार हाऊसफु ल झाला आहे. यातून संचारबंदीचे गणीत बिघडले असेच म्हणावे लागणार आहे.

जनतेच्या रेटयापुढे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना संचारबंदीचे आदेश काढावे लागले. दि. 12 जुलैपासून संचारबंदी सुरु झाली आहे. रविवार रात्रीपर्यंत हे आदेश कायम असणार आहेत. दरम्यानच्या काळात लोकांनी स्वतःहून रस्त्यावर येणे टाळले आहे.त्यामुळे फ ार कुठे पोलिसांना दंडुक्यांना तेल लावून बसण्याची गरज पडली नाही. मात्र सकाळच्या सत्रातील बाजारात उसळणारी गर्दी जागरूक नागरिकांच्या मनात धडकी भरविणारी होती.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाप्रमाणे जिल्ह्यात सकाळी दहा वाजल्यापासून संचारबंदी आदेश लागू झाले. या काळात किराणा दुकाने ही बंद ठेवण्यात आली.भाजीपाला एका जागेवर थांबून विकता गल्लो-गल्ली, ते ही दहाच्या आत यात पाणी जार, गॅस,दुध हे सगळे आलेच होते. तसे असताना वेगवेगळया भागात भरणार्‍या बाजारात ओसंडून वाहणार्‍या गर्दीवर पोलिसांसह महसूली प्रशासनाला नियंत्रण मिळविता आले नाही. बाजारापुरते का होईना संचारबंदीच्या काळात कोरोनात बाजार हाऊसफु ल भरला गेला.