बाराशेहून अधिक जणांची कोरोनावर मात;आज केवळ 769 बाधितांची नोंद

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- वाढती बाधित रुग्णांची संख्या हळूहळू घटू लागली,असून दि. 28 रोजी 769 नवे रुग्ण आढळून आले तर 1 हजार 232 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

गत 24 तासात 3हजार 632 जणांची चाचणी करण्यात आली. पॉझिटिव्ह संख्या 769 झाली, यात मनपा हद्दीत 309 तर ग्रामीण भागात 422 जणांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 78 हजार 701 तर यातून बरे झालेले रुग्ण संख्या 65 हजार 14 एवढी आहे.उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्या 82.60 एवढी आहे. सध्या 11 हजार 917 एवढी असून यातील 192 जणांची प्रकृती अतिगभीर आहे.
आजच्या प्राप्त प्रेसनोटमध्ये 24 जणांच्या मृत्यूची नोंद असून सहा महिला व 18 पुरुष आहेत. यात 26 वर्षीय महिलेचा सुद्धा समावेश आहे.