मुख्यमंत्री शिंदे,उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून नांदेड जिल्हा परिषदेचा गौरव;पुरस्काराचे श्रेय अधिकारी-कर्मचाऱ्यांना:-सीईओ ठाकूर

नांदेड

नांदेड,बातमी24:-प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेत नांदेड जिल्हा परिषदेला तीन पुरस्कार मिळाले आहेत. या तिन्ही पुरस्काराचे श्रेय हे या विभागात काम करणारे अधिकारी-कर्मचारी या सर्वांचे असल्याची भावना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी व्यक्त करत हा पुरस्कार काम करण्याची प्रेरणा देणारा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

आज मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर, राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांना हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
घरकुलाच्या उद्दिष्टाप्रमाणे शंभर टक्के मंजुरी देणे या राज्य पुरस्कृत आवास योजनेत राज्यात नांदेड जिल्ह्याला द्वितीय क्रमांक, लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी वित्तीय संस्थांचे कर्ज मिळवून देण्यासाठीचा दुसरा तर मूलभूत नागरी सुविधा देऊन आदर्श घरांची निर्मिती करण्यासाठी राज्यातला तिसरा पुरस्कार मिळाला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि इतर राज्य पुरस्कृत आवास योजनेत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी गट विकास अधिकारी ग्रामसेवक यांनी पुढाकार घेऊन ही काम केलेली आहेत त्यामुळेच नांदेड जिल्ह्याला राज्यातील तीन पुरस्कार मिळाले.

चौकट
नांदेड जिल्ह्याला आवास योजनेत तीन पुरस्कार मिळाले त्याबद्दल आनंद झाला. पुढील कामे करण्यासाठी हे पुरस्कार प्रेरणादायी आहेत. जास्तीत जास्त लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे घर देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत.
-मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे.