कोरोनाचा आकडेवारीत शनिवारी दिलासा

नांदेड

 

नांदेड,बातमी24:- मागच्या बऱ्याच दिवसांनंतर कोरोनाच्या संख्येने संख्येत कमालीची घट झाली आहे. त्याचसोबत 283 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारचा दिवस कोरोनाच्या काळात दिलासा देणारा ठरला आहे.

शनिवार दि.10 रोजी 1 हजार 342 जनाची चाचणी करण्यात आली. यात 1 हजार 166 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर 130 कोरोना बाधित आढळून आले. आरटी पीसीआर चाचणीत 44 तर अँटीजनमध्ये 86 जणांचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची संख्या 17 हजार 300 झाली आहे.यातील 14 हजार 192 जण कोरोना मुक्त झाले,यात आजच्या 283 जणांचा सुद्धा समावेश आहे.सध्या 2 हजार 551 जणांवर उपचार सुरू असून 45 जनाची प्रकृती गंभीर आहे.
——
चार जणांचा मृत्यू
वाजेगाव येथील 45 वर्षीय पुरुषाचा दि.9 रोजी,कंधार तालुक्यातील बहादरपूरा येथील 70 वर्षीय पुरुषाचा दि.9 रोजी,माहूर येथील 85 वर्षीय पुरुषाचा दि.9 रोजी तर बाबा नगर येथील दि.10 रोजी मृत्यू झाला.त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतची मृत्यूसंख्या 452 झाली आहे.