खासगी दवाखान्यातील त्याच मेडिकलमधून सक्तीने औषध खरेदी बंधनमुक्त:अन्न व औषध प्रशासन आयुक्त काळे यांचा निर्णय

नांदेड

जयपाल वाघमारे
नांदेड,बातमी24:- पूर्वी कोर्टाची आणि पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची वेळ येऊ नये असे म्हणत आता त्यातली त्याग खासगी रुग्णालयाची वेळ कुणावर लागू नये,अशी प्रार्थना लोक बाळगून असतात.याचे कारण म्हणजे अलिकडच्या काळात खासगी रुग्णालय हे रुग्ण सेवेचे माध्यम न राहता,पशु-पक्षाचे कत्तलखाने बनू पाहत आहे.कट प्रॅक्टिसच्या माध्यमातून रुग्णांची लूटमार चालविली जाते,त्यामुळे अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी रुग्ण उपचार घेणाऱ्या खासगी रुग्णालयातुन सक्तीने औषधी घेणे बंधनमुक्त केले असून तसे फलक रुग्णालयात लावण्याचे आदेश दि.9 डिसेंबर 2022 च्या पत्रानव्ये दिले आहेत.या आदेशामुळे रुग्णांना दिलासा तर रुग्णालय चालविणाऱ्या डॉक्टर व संबंधित व्यापाऱ्यास झटका मानला जात आहे.

खासगी रुग्णालय चालविणारी मंडळींसाठी पैसे टाका आणि पैसे कमवा असा धंदा मांडला आहे.रुग्ण आला तर त्यास औषधीमध्ये लूटमार करायची हे ठरलेले,यासाठी भरमसाठ औषधी कोर्स दिला जातो,महागडी औषध लिहून देणे असे प्रकार हे अलिखित आहेत. या सगळ्या प्रकाराला आळा कुठे तरी बसला पाहिजे,या उद्देशाने तसेच यासंबंधी तक्रारीची दखल घेत अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांनी आदेश देताना म्हणाले,की रुग्णांना त्याच रुग्णालयातून औषधी करावी अशी सक्ती केली जाते,अशी सक्ती करणे रुग्णांना बंधकारक नसून हे नियमबाह्य आहे. रुग्ण हे कोणत्याही परवाना धारक विक्रते यांच्याकडून औषधी करू शकतात त्यांना तशी मुभा असल्याचे नमूद केले आहे.

या आदेशामुळे खासगी रूग्णालयात संलग्न मेडिकलमधून औषधी खरेदी करणे सक्तीचे नसून
रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे कोणत्याही मेडिकलमधून खरेदी करू शकतात,असे फलक रूग्णालयात जाहीरपणे ठळक स्वरूपात लावावे,तेही रुग्णांना दिसतील अशा दर्शनीय भागात प्रदर्शित करावे असे अभिमन्यू काळे यांनी आदेशित केले आहे. या आदेशामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना दिलासा मिळणार असून खासगी रुग्णलाय चालविणाऱ्यांची औषधी पुरती का असेना मक्तेदारी मोडीत निघण्यास मदत होणार आहे.