बावरीनगर येथे 5 जुलै पासून श्रामणेर प्रक्षिशण

नांदेड

नांदेड, बातमी24ः- महाविहार बावरीनगर दाभड-नांदेड येथे आषाढी पौर्णिमा निमित्त दि. 5 जुलै ते आश्विन पौर्णिमा दि. 1 ऑक्टोबर दरम्यान वर्षावासानिमित्त श्रामणेर शिबीराचे आयोजन करण्यात आलेले आहे.या श्रामणेर शिबिरात उपासक-उपासिका यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविहार बावरीनगर चे मुख्य प्रवर्तक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या वर्षा ऋतूमध्ये भिक्खूंना धम्माचा प्रचार-प्रसार करताना पावसाचा तथा तत्सम अडचणींचा त्रास होऊ नये,तथागत भगवान बुद्धांनी या कालावधीत वर्षावासा संबंधीचे विनय भिक्खुंना सांगितले. त्यानुसार भिक्खूंनी वर्षा ऋतुमध्ये एकाच ठिकाणी (विहारात) निवास करावा, असा नियम सांगितला. या काळात उपासक -उपासिका बुद्ध विहारात जाऊन धम्म ग्रहण करीत असतात.

सदर तीन महिन्याच्या कालावधीत महाविहार बावरीनगर येथे श्रामणेर प्रक्षिशण देण्यात येणार आहे. या कालावधित बौद्ध धम्म संबंधी (संस्कार, संस्कृती) सखोल व गांभिर्यपूर्वक ज्ञान मिळवण्याची संधी उपासक उपासिकांना लाभणार आहे. प्रमुख मार्गदर्शक म्हणुन श्रद्धेय भिक्खू धम्मसेवक महाथेरो, श्रद्धेय भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, श्रद्धेय भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो, भिक्खू पत्र्त्रारत्न थेरो, भिक्खू संघपाल, भिक्खू शीलरत्न व श्रद्धेय भिक्खू संघाची उपस्थिती लाभणार आहे.

वय वर्षे 12 ते 30 दरम्यान असलेल्या उपासकांनी मोठ्या संख्येने श्रामणेर प्रक्षिणात सहभागी होऊन धम्मदानाने लाभान्वित व्हावे व श्रामणेर प्राक्षिणात सहभागी होण्यासाठी दि. 2 जुलै पर्यंत भिक्खू विनय बोधीप्रिय थेरो, भिक्खू पत्र्त्रारत्न थेरो, भिक्खू संघपाल, भिक्खू शीलरत्न, इंजि. यशवंत गच्चे, डॉ. मिलिंद भालेराव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.
——
चौकट
श्रामणेर शिबिरात सहभागी होऊ इच्छिणार्‍या उपासकांची कोविड-19 कोरोना तपासणी करूनच त्यांना प्रशिक्षणात सहभागी करून घेतले जाणार आहे, अशी माहिती शिबिराच्या संयोजकांकडून देण्यात आलेली आहे