सोळा जणांमध्ये त्या आमदार कुटूंबातील नऊ जण पॉझिटिव्ह

नांदेड

नांदेड,बातमी24:-रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास 46 नमुन्याचा अहवाल आला असून यात सोळा जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यात नऊ जण हे नांदेड दक्षिणचे काँग्रेस आमदार यांच्या कुटूंबातील सदस्य आहेत.

शनिवार दि.27 जून रोजी सायंकाळपर्यंत अहवाल प्रलंबित होते.मात्र आठ वाजून 40 मिनिटांनी प्रशासनाकडून अहवाल कळविण्यात आला आहे. यामध्ये 46 नमुन्यामध्ये 18 अहवाल निगेटिव्ह,10 अहवाल अनिर्णित,2 अहवाल नाकारण्यात आले,तर 16 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

यात 16 पैकी 9 अहवाल एकट्या विष्णुपुरी येथील एकाच बड्या राजकीय कुटूंबातील सदस्याचा समावेश आहे. यामध्ये सहा महिला व तीन पुरुषाचा समावेश आहे.

नऊ जणांमध्ये 5 वर्षाची मुलगी,6 वर्षांचा मुलाच समावेश आहे. तर 19 व 35 वर्षीय पुरुष, तसेच 29,45,57 व 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

या व्यतिरिक्त गवळीपुरा येथील 41 वर्षीय, चैतन्य नगर येथील 48 वर्षीय पुरुष, पिरबुऱ्हाण नगरमधील 4 वर्षीय बालक, सिडको भागातील तीन पॉझिटिव्ह आले आहेत, यामध्ये मुभा मशीद येथील 43 वर्षीय महिला व 24 तसेच 50 वर्षीय पुरुष आहे.तसेच देगलूर तालुक्यातील बळेगाव येथील 21 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 365 झाली आहे.