शिक्षकाच्या मुलाची युपीएससी परीक्षेत यशाला गवसणी

नांदेड

नायगाव, बातमी24ः-केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवार दि. 4 रोजी जाहीर झाला.नायगाव तालुक्याच्या शेळगांव (गौरी) येथील योगेश अशोक बावणे यांनी यूपीएससी परीक्षेत 63 वा रँक मिळविला. योगेश बावणे यांचे वडिल हे जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षक आहेत.

योगेश बावणे हे नायगाव तालुक्यातील शेळगांव गौरी येथील असून त्यांचे शालेय शिक्षण शेळगांव गौरी येथील जिल्हा परिषदेत झाले आहे. तर उच्च माध्यमिक शिक्षण हे कै.रामचंद्र पा.मा.विद्यालय शेळगांव गौरी येथे झाले. शेळगांव गौरी सारख्या ग्रामीण भागात शिक्षण घेऊन योगेश अशोक बावणे यांनी दुसर्‍या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश संपादन करत गावाचे नाव जिल्ह्याभरात रोषण केले. या यशाबद्दल जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षांव होत आहे.