कोरोनाची रुग्णसंख्या शंभरी नजीक; नियम पाळा कोरोना टाळा

नांदेड

नांदेड,बातमी24:-मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत चालली,असून रविवारी आलेल्या अहवालात तब्बल 90 जणांचे स्वब कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

मधल्या काळात खंडीत झालेली रुग्णसंख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. यात नांदेड जिल्ह्यात दिवसाकाठी साठ ते सत्तर रुग्ण वाढत होते. रविवारी हा आकडा नवद झाला आहे.यात 1 हजार 835 जणांचे अहवाल तपासण्यात आले.यामध्ये 90 जण कोरोना पॉझिटिव्ह आले.आरटीपीसीआर चाचणीत 52 व अँटीजनमध्ये 38 जणांचा समावेश आहे. सध्या 557 जनावर उपचार सुरू असून यातील 17 जणांची प्रकृती गंभीर आहे.तर आतापर्यंत 598 जण कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू पावले आहेत.