कोरोनाबाबत काळजी घेणे एकमेव पर्याय:सीएस डॉ.नीलकंठ भोसीकर

नांदेड

नांदेड, बातमी24:- कोरोनाची दुसरी लाट पूर्वीच्या लाटपेक्षा भयंकर आहे. नागरिकांनी स्वतः होऊन काळजी घेणे हा त्यातील एकमेव पर्याय आहे.त्यामुळे नागरिकांनी मास्क,सॅनिटायझर व गर्दीत जाणे टाळावे,असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नीलकंठ भोसीकर यांनी केले.

यावेळी बोलताना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.भोसीकर म्हणाले,की मागच्या काही दिवसांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असून या कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग पसरण्याची क्षमता अधिक आहे.

संसर्ग पसरू नये,यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न केले जात आहे.ज्यांच्याकडून कोरोना संसर्ग जोमाने पसरू शकतो,असे भाजीपाला विक्रेते,दूध वाहक आदी ते लोकांच्या अधिक संपर्कात येतात, अशा सुपर स्प्रेड़ेर लोकांची कोरोना चाचणी पहिल्या टप्प्यात केली आहे.या चाचण्याचे प्रमाण म्हणजे संख्या 2 ते अडीच हजार करण्याची तयारी प्रशासनाकडून केली जात,असून त्या अनुषंगाने रोज किमान दोन हजार चाचण्या केल्या जात आहे. रुग्णसंख्या वाढत असली,तरी तूर्त मृत्यूदर नगण्य आहे,ही समाधानकारक बाब असल्याचे डॉ.भोसीकर म्हणाले.

नागिरकांनी गाफील राहून चालणार नाही,सजग राहने महत्वाचे आहे.घराबाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य आहे,सोबत सॅनिटायझर सोबत बाळगावे, वेळोवेळी हात धूत राहणे,बाहेर पडल्यानंतर हाताचा डोळे व तोंडाला स्पर्श होऊ देणे टाळावे, जेणेकरून आपण सर्व जण कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करू शकू असे डॉ भोसीकर यांनी नमूद केले.
——–
प्रशासन सज्ज:-डॉ.भोसीकर
मागच्या वर्षभरापास कोरोनाची लढाई प्रशासन लढत आहे.हजारो उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या आपण निववल 14 आणली होती.हे सर्व वैधकीय यंत्रणेचे यश आहे.दुसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली, असून उपाययोजना तयार ठेवल्याचे डॉ.भोसीकर यांनी सांगितले.