जिल्ह्यात तीनशे रुग्णांचा टप्पा पार;उपचार घेणारे फक्त102 रुग्ण

नांदेड
नांदेड,बातमी24– जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांनी तीनशे रुग्णांचा टप्पा पार केला आहे.दिवसभरात एक रुग्ण सापडला होता,तर काही अहवाल पुन्हा आले असून यात तीन रुग्ण सापडले असून हे रुग्ण स्थलांतरित होऊन आलेले आहेत.
सायंकाळी प्रशासनाकडून अहवाल 48 नमुन्याचा अहवाल प्राप्त झाला.यात 47 अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला.सदरचा रुग्ण 23 वर्षीय असून शहरातील सुंदर नगर भागातील आहे.
यानंतर काही मिनिटापूर्वी तीन अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले असून तिन्ही महिला आहेत.विशेष म्हणजे या तिन्ही महिलांची कोरोना पार्श्वभूमी इतर जिल्ह्यातील आहे.
इतवारा भागातील मंडई येथील 45 वर्षीय हैद्राबाद येथून आलेली आहे.नाथ नगर भागातील 12 मुलगी ही पुण्यावरून आली तर तसेच याच भागातील मुलगी जिचे वय 16 असून ती सुद्धा काही दिवसांपूर्वी पुणे येथून आली आहे.
जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांनी 300 आकडा पार केला आहे.186 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 102 रुग्ण हे उपचार घेत आहेत