कोरोनाचा पंचविसावा बळीः रुग्णसंख्येत वाढ

नांदेड

नांदेड, बातमी24ः- कोरोनामुळे रविवारपासून मृत्यूचा आकडा थांबण्याचे नाव घेत नसून शुक्रवारी सुद्धा एका कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या 25 झाली आहे. तर नव्याने सतरा रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत. आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 558 इतकी झाली आहे.

गुरुवारी नांदेड जिल्ह्यात तब्बल 30 नव्या रुग्णांची भर पडली होती. त्यानंतर शुक्रवारी आलेल्या अहवालात 17 नवे रुग्ण सापडले आहेत. तर कंधार तालुक्यातील इमामवाडी येथील एका 52 वर्षीय इसमाचा एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पाच रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 358 झाली आहे. तर उपचार घेत असलेले रुग्ण हे 175 आहेत. गंभीर रुग्ण संख्या 18 आहे. यात दहा महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे.
——-
पत्ता————-स्त्री/पुरुष———–वय
1)आनंद नगर(परभणी)–पुुरुष———–34

2)माळाकोळी(लोहा)—पुरुष———–33

3)बळवंत नगर(नायगाव)-पुरुष———-12

4)इमामवाडी(कंधार)—पुरुष———–56

5)मदनपुर(मुखडे)—–पुरुष———–56

6)मदनपुर(मुखडे)—–स्त्री————50

7)वाल्मिक नगर(मुखेड)-पुरुष———–22

8)व्यंकटेश नगर(मुखेड)-पुरुष———–45

9)व्यंकटेश नगर(मुखेड)-स्त्री————38

10)तबलीन गल्ली(मुखेड)-स्त्री———–30

11)तबलीन गल्ली(मुखेड)-स्त्री———–28

12)तबलीन गल्ली(मुखेड)-स्त्री———–43

13)तबलीन गल्ली(मुखेड)-स्त्री———–35

14)तबलीन गल्ली(मुखेड)-स्त्री———–09

15)तबलीन गल्ली(मुखेड)-स्त्री———–13
16)तबलीन गल्ली(मुखेड)-स्त्री———–30