दिवसभरातील अहवाल प्रलंबित; पाच रुग्णांना डिस्चार्ज

नांदेड

 

नांदेड, बातमी24:- दिवसभराच्या काळात एकही नमुन्यांचा अहवाल प्रयोग शाळेकडून आले नाहीत. मात्र आज सकाळी पाच जणांना कोविडं केअर सेंटर येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शुक्रवारी सायंकाळ ते रात्री उशीरापर्यंत 18 अहवाल पॉझिटिव्ह आले तर सकाळी गुलजार बाग येथील एका रुग्णाचा मृत्यू झाला. शनिवारी दि.27 जुन रोजी 86 अहवाल घेण्यात आले,तर 29 पूर्वीचे असे मिळून 115 अहवाल येणे बाकी आहेत.

कोविड केअर सेंटर येथील 5 रुग्ण बरे झाल्याने कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 275 झाली आहे. तर कोरोनाच्या रुग्णांची संख्या 349 झाली आहे.16 जण मरण पावले आहेत.135 जण निरीक्षणाखाली आहेत. तर उपचार घेणारे रुग्ण 58 आहेत.