गंभीर रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ;पाच जणांचा मृत्यू

महाराष्ट्र

 

नांदेड, बातमी24:- कालच्या तुलनेत बुधवारी कोरोनाच्या संसर्गामुळे अतिगंभीर रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली,असून ही संख्या 56 झाली आहेत,तर आज आलेल्या अहवालात 5 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

बुधवार दि.30 रोजी 1 हजार 254 चाचण्या करण्यात आल्या. 964 अहवाल निगेटिव्ह आले, तर 264 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.त्यामुळे जिल्हयातील आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या 15 हजार 706 पर्यंत गेली, तसेच 11 हजार 953 जण हे कोरोना मुक्त झाले, यात आजच्या 238 रुग्णांचा सुद्धा समावेश आहे.संख्या 3 हजार 255 जणांवर उपचार सुरू,असून 56 जणांची मृत्यूशी लढा सुरू आहे.
——-
पाच जणांचा मृत्यू
नायगाव तालुक्यातील नरसी येथील 72 वर्षीय पुरुषाचा दि.29 रोजी, नांदेड तालुक्यातील बडपूर येथील 65 वर्षीय पुरुषाचा दि.29 रोजी,हडको येथील 69 वर्षीय पुरुषाचा दि.29 रोजी,नांदेड शहरातील अशोक नगर येथील 67 वर्षीय महिलेचा दि.29 रोजी,तर मुखेड येथील 65 वर्षीय महिलेचा दि.30 रोजी मृत्यू झाला,त्यामुळे जिह्यातील मृतांचा आकडा 403 झाला आहे.