आमदार रावसाहेब अंतापुरकर यांची प्रकृती चिंताजनक; निधनाची वृत्त निरर्थकः डी. पी. सावंत

महाराष्ट्र

नांदेड,बातमी24ः देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे कोरोनाच्या संसर्गामुळे मुंबई येथे उपचार सुरु आहेत. मात्र त्यांचे निधन झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे नांदेड जिल्ह्यात पसरले आहेत. हे वृत्त निरर्थक व खोडसाळपणाचे असल्याची माहिती माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत यांनी दिली.

आमदार रावसाहेब अंतापुरकर यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर नांदेड येथे प्राथमिक उपचार करून मुंबई येथील टाटा हॉस्पीटल येथे हलविण्यात आले आहे. कोरोनाच्या संसर्गावर मात केली, असून निमोनियाचा संसर्ग वाढल्याने यकृत निकामी झाले असल्याने त्यांच्यावर डायलेसीस सुरु आहे. रावसाहेब अंतापुरकर यांची प्रकृती नाजूक आहे. यात काही शंका नाही. यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी सार्वजनिक बाधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी संवाद साधल्याचे डी.पी.सावंत यांनी सांगितले.