नांदेडकरांच्या प्रेमाने समाजकल्याण सचिव भांगे भारावले; मंत्र्यांना लाजवेल अशी लोकांची तोबा गर्दी

महाराष्ट्र

नांदेड,बातमी24: एकादी फार मोठी राजकारणी व्यक्ती,किंवा त्यातली-त्यात कुणी मंत्री असेल तर त्यास भेटायला येणाऱ्यांची संख्या भरमसाठ असते,मात्र जिल्ह्यात आठ-दहा वर्षाखाली काम करून जाणारा अधिकारी नांदेडला आल्याच समजताच शेकडोच्या संख्येने लोक भेटायला येतात,आणि आलेल्या प्रत्येकाची आदरपूर्वक आस्थेने विचारपूरस करून मने जिंकरणारे अधिकारी फार कमी म्हणजे अगदी नगण्यच,यास अपवाद ठरले ते समाजकल्याण विभागाचे सचिव सुमंत भांगे होय.निमित्त होत नांदेड येथील एका खासगी दौऱ्याच होय.

 

नांदेड जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सन 2013 ते 2015 या दोन वर्षाच्या सालात सुमंत भांगे यांनी सेवा बजावली.त्या काळात दिलदार मनाचा राजा माणूस अशी भांगे यांची जिल्हाभर ख्याती राहिली, अधिकारी,कर्मचारी,राजकारणी,पत्रकार व इतर सर्वत्र क्षेत्रातील लोकांशी त्यांचा जवळून संबंध आला होता,जमिनी पातळीवरील अधिकारी म्हणून ते सर्वसामान्यात परिचित होते. ते नांदेड जिल्हा परिषद सीईओ म्हणून2 येण्यापूर्वी ते नांदेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून ही राहिले होते.

शासकीय नौकरीत अधिकारी हे फारसा लोकसंग्रह करण्याच्या भानगडीत पडत नाहीत,कामाशी काम करून बाजूला राहण्यात धन्यता समजतात.मात्र भांगे हे मैत्री आणि संबंध जपणारा आणि शक्य तो लोकांच्या मदतीला पडणारा असा मानवी मूल्य जपणारा चेहरा अशी त्यांची अधिक ओळखल जिल्ह्याला राहिली आहे.

याची प्रचिती आज नांदेडकराना पुन्हा अनुभवायला मिळावी,निमित्त होत ते समाजकल्याण सचिव भांगे हे एका कोर्टाच्या कामानिमित्त नांदेडला आल्याच,ते नांदेडला येणार असल्याचे माहिती होताच शासकीय रेस्टहाऊस येते सकाळपासून लोकांनी तोबा गर्दी केली.यात अधिकारी, कर्मचारी, राजकारणी आणि पत्रकार सुद्धा अपवाद नव्हते.

भेटीस आलेल्या प्रत्येकास प्रेमाने विचारपूस करून कौटूंबिक चौकशी करणारा आपला माणूस म्हणून प्रेम देणारा अधिकारी सुमंत भांगे यांच्याशिवाय इतर सनदी अधिकारी असू शकत नाही,ही प्रतिक्रिया उटणे सहाजिक होत. यात काही लोकांची निवेदने ही स्वीकारून ते तात्काळ मार्गी काढून मला कळवावे,अशा सूचना ते अधिकाऱ्यांना देऊन गेले. एक दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या सुमंत भांगे यांना रेल्वे स्टेशनला निरोप देण्यास आलेल्या लोकांची संख्या ही लक्षणीय म्हणावी लागेल,आठ वर्षा पूर्वी बदलीने निघून गेल्यानंतरही नांदेडकरांनी दिलेल्या प्रेमाने भांगे हे भारावून गेले.तर भांगे यांच्या संपर्कात यापूर्वी आलेला प्रत्येक माणूस आजच्या भेटीने सुखावून गेल्याचे चित्र निराळाच होत.