त्या व्हिडिओने सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाणांची सुद्धा झोप उडावली

क्राईम महाराष्ट्र

नांदेड,बातमी विशेष:- उधोजक तथा बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या गोळ्या झाडून करण्यात आलेला व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र कालपासून फिरत आहे.हा व्हिडिओ पासून माझी सुद्धा रात्रभर झोप उडाली.मी सुद्धा रात्रभर झोपू शकलो नसल्याची कबुली राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

मंगळवार दि.5 रोजी संजय बियाणी यांची गोळया झाडून त्यांच्या राहत्या घरासमोर हत्या करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तात्काळ नांदेड येथे येण्याचा निर्णय घेतला.ते आज सकाळी येथे पोहचले असता,मयत संजय बियाणी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेत कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.

गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कारावेळी श्रद्धांजलीपर भाषणात अशोक चव्हाण म्हणाले,की संजय बियाणी यांनी अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली.या घटनेचा व्हिडिओ माझ्याकडे आल्यानंतर पाहिला, असता मी सुद्धा झोपू शकलो नाही.इतका भयंकर होता. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ही अशोक चव्हाण यांनी भयकर प्रकारे हत्याकांड घडवून आणले गेले,असून हा व्हिडिओ पाहून झोपू शकलो नसल्याचे त्यांनी सांगितले.या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी केली जाईल,या प्रकरणात पोलीस कुठेही कमी पडणार नसून यापुढे दादागिरी खपवून घेतली जाणार नसल्याचे अशोक चव्हाण यांनी सांगितले.