पिपल्स रिपब्लिकन पक्षाच्या महासचिवपदी बापूराव गजभारे

राजकारण

 

नांदेड,बातमी24:-पिपल्स रिपब्लिकन पक्ष (कवाडे गट) महासचिवपदी नांदेड वाघाला महापालिकेचे नगरसेवक बापूराव गजभारे यांची नियुक्ती करण्यात आली.या नियुक्तीबद्दल गजभारे यांचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत झाली. य बैठकीला राज्यभरतील कार्यकारणी सदस्य हजर होते.

या झालेल्या बैठकीत नव कार्यकारणी गठीत करण्यात आली. यामध्ये प्रदेशाध्यक्षपदी भाई गणेश उनव्हने,प्रदेश कार्याध्यक्ष भाई चंद्रसेन इंगोले यांची तर पक्षाच्या महासचिवपदी नगरसेवक बापूराव गजभारे,तर पक्ष प्रभारी म्हणून गोपाळराव आटोटे यांच्या नियुक्तीची घोषणा प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी केली.

या जम्बो कार्यकारिणीत सहा उपाध्यक्ष, पाच सचिव,सहसचिव-2,एक संघटनसचिव,5 संघटक,3 सहसंघटक,दोन प्रवक्ता व एक सहप्रवक्ता आणि तीस कार्यकारणी सदस्यांचा समावेश आहे.यात महासचिव एकमेव बापूराव गजभारे आहेत.

या नियुक्तीबद्दल बापूराव गजभारे यांचे सर्वस्तरातून स्वागत केले असून महापालिकेत स्थायी समिती सभापती गाडीवाले,यांच्या सह नगरसेवक यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. राज्यभर पक्ष विस्तार कार्यात वाहून घेणार असल्याचे यावेळी बापूराव गजभारे यांनी प्रतिक्रिया नोंदविली.