राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्यांचा भाजप प्रवेश

राजकारण

नांदेड,बातमी24:- कंधार तालुक्यातील काटकंळबा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी खा.प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात शनिवार दि.29 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

कंधार तालुक्यातील काटकळंबा येथील ग्रामपंचायत सदस्य अशोक शामराव चावरे व माधव विनायकराव वाकोरे यांना पक्षात डावलले जात असल्याचे खंत व्यक्त करत राष्ट्रवादीला रामराम ठोकला.

शनिवारी दि.29 ऑगस्ट रोजी खा.चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी खा.चिखलीकर यांनी अशोक शामराव चावरे व माधव विनायकराव वाकोरे यांना पक्षात प्रवेश दिला.यावेळी भाजप महानगराध्यक्ष प्रविण साले,काटकंळबा येथील भाजपाचे उपसरपंच गोविंदराव पाटील वाकोरे, साईनाथ कोळगीरे, शिवाजी वाकोरे, मारोती बस्वदे, नवाज सय्यद, सिध्दार्थ चावरे आदींची उपस्थिती होती.
—-